अभिजित,

x व x-dx ह्या दोन्ही अंतरात फारच थोडा फरक असला तरी ह्याचा परिणाम जाणवण्या एवढा असतो. सध्या x-dx अंतर असताना दक्षिणायन चालू असल्यामुळे दक्षिण गोलार्धातील उन्हाळा उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यापेक्षा तीव्र असतो. कक्षावक्रता बदलल्याने अंतरामधे y व y-dy असा फरक असेल. y हा x पेक्षा कमी वा जास्त असेल त्यानुसार dy मधेही फरक पडेल आणि त्यामुळे पृथ्वीला मिळणाऱ्या सौरऊर्जेमधे फरक पडेल. सौरऊर्जा ही वातावरणाची 'चालक' असल्यामुळे हवामानावरील परिणाम अपरिहार्य. 

वरदा