कविता ग्रहणातील माझे तुटपुंजे ज्ञान पाजळण्याबद्दल क्षमस्व!

खिडकीशी बसून मी बाहेर बघत आहे.
पाहतो आहे प्रतिबिंब माझे
काचेपलीकडून आत बघणारे
कोणते वास्तव, कोणते आभास ?
की खिडकी हेच एकमेव सत्य आहे
दोन भासांमधील ?

इतपत कविता कळली. हे छान. पुढे ढेपाळली.

एकोचे प्रेम अव्हेरल्याबद्दल तिने नर्सिससला शाप दिला की तू ज्याच्या प्रेमात पडशील तो/ ती तुझ्या प्रेमाला प्रतिसाद देणार नाही. नर्सिससने पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले असता तो स्वतःच्याच प्रेमात पडला आणि प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने झुरून (की पाण्यात पडून) मेला अशी काहीशी ग्रीक पुराणकथा आहे.

मी - नार्सिससचा खरा वारसदार म्हणताना कवितेशी तिचा संबंध कसा?