आम्ही जवळपासच्या सगळ्या वर्कस्टेशन साठी एकदा दिवाळी हाच विषय घेतला होता. जवळच छोटा किल्ला वगैरे बनवला होता. क्युबिकलमधे रांगोळ्या काढल्या होत्या, तोरण, कंदील वगैरे. फराळही चकटफू (परीक्षकांनाच हं  )

रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या, प्रत्येक क्युबमधे वेगळी, ठिपक्यांची, मुक्तहस्त, फुलांची वगैरे. हे इतकं छान अजमून आलं की सगळ्यांना मिळून दुसरं बक्षिस मिळालं होतं