आजच्या संगीताविषयी आणि पिढीविषयी विशेष माहिती नसल्यासारखे निष्कर्ष ! पूर्वीच्या संगीतकारांनी बऱ्यापैकी संगीताचा अभ्यास केला होता हाही निष्कर्ष तितकासा बरोबर नाही.(उदा.ओ.पी. नय्यर)ए. आर. रहमान किंवा शंकर एहसान लॉय हे आजचे संगीतकारच आहेत.आणि त्यांच्या संगीतात गोडवा नाही असे म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. शंकर महादेवन् यानी श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचा अभ्यास केला आहे आणि त्यांच्या संगीताचे श्री.खळे यांनीही कौतुक केले आहे‌. सारेगमपा मध्ये भाग घेणारे नव्या पिढीतीलच तरुण तरुणी असतात आणि शास्रीय संगीताचाही त्यानी उत्तम अभ्यास केलेला आहे हे त्यांच्या अदाकारीवरून जाणवते.