तालवाद्यांचा आवाज वाद्यांबर आणि गायकांवर जरा जास्तच कुरघोडी करतो असं वाटतं. पाश्चात्य संगीतात ठोके किंवा बीटस असतात पण ते तितके कर्कश्श वाटत नाहीत. गोड नाद आणि नादात सुसंवाद निर्माण करण्याकडे पाश्चात्यांचाही कल असावा.
आपल्याकडे मात्र बीटसचा अतिरेक होतो असं वाटतं. विशेषतः कानात गट्टू घालून जर रेडिओ वगरे ऐकायचा प्रयत्न केला तर काही वेळाने बीटसच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या कर्कश्श आदळापटीमुळे कान आणि डोकं दोन्हीही दुखायला लागतं.
पण आजही मेलोडियस- कर्णमधुर संगीत ऐकायला मिळतं फक्त खाजगी रेडिओ केंद्र त्याला योग्य पसिद्धी देत नसावीत. कुशाग्र यांनी म्हटल्याप्रमाणे शंकर महादेवन् यांची गाणी खूपच श्रवणीय असतात. ए आर रहमान आणि शंकर महादेवन सतत नवनवीन प्रयोग करत असतात. उदाहरणादाखल रंग दे बसंती किंवा स्वदेस मधली गाणी ऐकावीत. अगदी गुरू मधली गाणीही छान आहेत(अर्थ समजत नाही पण गाणे ऐकत राहावेसे वाटते). शिवाय पहेली, देवदास वगैरे चित्रपटांची गाणी श्रवणीय आहेत.