आधारित प्रमाणे निगडित हे संस्कृत रूप आहे हे श्री. महेश यांनी लिहिलेच आहे. मराठीतला ईत प्रत्यय पुढील शब्दात दिसतोः-- चकचकीत, ढळढळीत इत्यादी ध्वनिसदृश शब्दात.
(२)चालू क्रिया दाखवण्यासाठी.:-लिहीत आहे/होता/असेल. हल्ली करीत, बसीत मारीत ही रूपे जाऊन करत, बसत मारत हीच रूपे प्रचारात आहेत. 'ह'च्यापुढे अक्षर आल्यास मात्र प्रकार वेगळा होतो. लिहत पेक्षा लिहीत, पोहत पेक्षा पोहोत, राहीत ऐवजी रहात, पाहीत पेक्षा पहात ही रूपे व्यवहारात आली आहेत. केवळ उच्चाराच्या सोयीसाठी! अर्थात तीपण बरोबर आहेत.
इक हा संस्कृत प्रत्यय नामांना आणि धातूंना लागतो. -- मासिक, जागतिक, संकलित, आधारित वगैरे. ईक हा मराठी प्रत्यय मोकळीक, गिऱ्हाईक, लाडीक, पडीक, असडीक, खर्चीक इत्यादी शब्दात दिसतो. .
राजकीय, शासकीय मधला ईय आणि क्षत्रिय, श्रोत्रिय, यज्ञिय यांतला इय वेगळे आहेत. तसे मलिन, कुटुंबिनी, डाकिनी यातला इन आणि कुलीन, शालीन यांतला ईन हे प्रत्यय भिन्न आहेत.