आपल्याकडे क्रिकेटबद्दल फारच आत्मियतेने बोलले जाते हे खरे आहे. मी सुद्धा क्रिकेटचा चाहता आहे. पण त्याच बरोबर फुटबॉल, हॉकी, टेनिस हेही खेळ तितकेच उत्कंठावर्धक आहेत. त्यांच्याबद्दलपण तितक्याच आत्मियतेने का नाही चर्चा होत? नुकतीच भारतीय हॉकी संघाने अशिया चषक जिंकला, पण क्रिकेट संघाचे भाग्य त्यांच्या नशिबात नव्हते. फुटबॉल संघ प्रतिष्ठेचा नेहरू चषक पहिल्यांदाच जिंकतो, पण ते कुणाच्या गावीही नसतं. आनंद बुद्धीबळात दुसर्यांदा विश्वविजेता बनतो, पण त्याच्या भारतातल्या स्वागताची त्याला स्वत:ला आठवण करून द्यावी लागते.
याला क्रिकेटचे भाग्य म्हणायचे की इतर खेळांचे दुर्भाग्य....!