आजच्या (२७ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाइम्स (पान क्र.२०) मधील बातमी वाचली का? धोनीला झारखंड सरकारने ५ लाख रूपयांचे पारितोषिक दिले होते. ते सर्व त्याने मुख्यमंत्री रिलीफ फंडाला दान करून टाकले. एक टोयोटा कार मिळाल्याचाही उल्लेख आहे. यापेक्षा मोठ्या रकमा त्याला मिळाल्या आहेत. पण ५ लाख काही थोडी रक्कम नाही. सचिन तेंडुलकरने काही मुलांना दत्तक घेतल्याचे काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. बाकी खेळाडूंनीही अशा प्रकारे थोडी थोडी सामाजिक जाणीव ठेवली तर चांगले होईल. यानिमित्ताने ढोणीचा अजून एक सकारात्मक पैलू समोर आला आहे. वर्तमानपत्रे अधिक खपासाठी आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे टीआरपी साठी खेळाडूंना मोठे वा लहान बनवत असतात. त्यामुळे त्यांची बरीवाईट प्रतिमा आपल्यासमोर उभी राहात असते. आपण एवढेच पहावे की आपण त्याबरोबर वाहत तर जात नाही आहोत ना!