मी हे सर्व लिहीले आहे याचा अर्थ हे सगळे माझ्याच घरात घडते आहे असे नाही. सगळीकडे थोड्याफार फरकाने हे घडतच असते. तेव्हा " दुःख आवरा....हेही दिवस जातील..." असे तुमचे म्हणणे चुकीचे आहे. मी सगळ्या हतबल झालेल्या भारतीय पुरूष मंडळींच्या वतीने लिहीले आहे. तुमचे कदाचीत लग्न झाले नसावे म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकारांची गम्मत वाटते आहे. एकदा लग्न झाले की मग भेटा (मनोगत वर). मग बोलू. मग बघू तुम्ही कसे हताळता ते प्रश्न. किंवा लग्न झालेले असेल तर आम्हालाही सांगा की, हे कसे हाताळले पाहिजे? म्हणून म्हणतो की लग्न होईपर्यंत थोडा धीर धरा. किंवा लग्न झालेले असल्यास भांडण सूरू होईपर्यंत धीर धरा. आणि आणखी त्यात भरिस भर म्हणून या सगळ्या एकता छाप सासू सून मालिका. तुम्हाला या मालिकांबद्दल काय वाटते, धीरजराव? बरं, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरात / गावात राहात आहात? मी सध्या ईंग्लंड मध्ये आहे, काही महीन्यांसाठी. तेव्हा इथली प्रगती बघून वाटते की, आपल्या कडे एकूणच लादलेल्या नातेसंबंधाचा अति बाऊ केला जातो. भारत हा जगातला एकमेव असा देश आहे की तेथे कुटुंब व्यवस्था टिकून आहे, हे जरी खरे असले तरी, अति तेथे माती होते. तेव्हा अशा अति लादलेल्या नातेसंबंधांपासून जेव्हा आपण मुक्त होवू तेव्हाच भारत हा देश प्रगतीशील न रहता प्रगत देश बनेल. यावर मला तुमचे प्रामाणिक मत हवे आहे.