मी अगदी नवीन पिढीतला असलो तरी जुनी गाणीदेखील फार आवडतात!! मला असं वाटतं, जितकं संगीत, नाद, लय महत्त्वाची तितकेच शब्दांची यथायोग्य निवड ही जुन्या गाण्यांची खासियत. नविन गाणी सगळीच धागडधिंगा करणारी नसली तरी बऱ्याचदा शब्दांमधे मार खातात असं वाटलं.
शिवाय "टिकाऊ" संगीत नाही म्हणणं अन्यायकारक आहे. सध्या नवीन युगात वेगवेगळ संगीत ऐकण इतकं सोप्पं झालय की केवळ एकाच प्रकारची गाणी ऐकत बसणं दुरापास्त झालय. हल्ली आमच्या गीतमालेत नवं, जूनं, शास्त्रीय, रॉक, अरेबिक सगळं सगळं असतं. पण त्यामुळे प्रत्येकाची आवड इतकी वेगळी अस्ते की एक कुठलं संगीत प्रत्येकाला आवडेल असं होण कठीण असतं. तरीही अनेक सुमधूर गाणी येतात आहेत की. स्वदेस, लगान, परिणिता, रंग दे बसंती, इथ पासून ते इंडी पॉप सगळ आहे!