मिलिंद तुमची क़ैद ही ग़ज़ल वाचली. अतिशय सुंदर आहे. इतकी सुंदर की उर्दूतील एका उत्तम ग़ज़लेचा तुम्ही मराठीत, क़ैदेत तर अनुवाद केला नाही ना, अशी दाट शंका यावी. कधी ग़ालिब, कधी मीर, तर कधी वली दक़नी. वा.

गर्भार मेघमाला, आषाढमास दाई
का कोंडल्या जळाला तरिही बहाव नाही

जुन्या भाषेतले शब्द आणि लकबी तुम्ही तुमच्या ग़ज़लेत सहज आणून तुमच्या ग़ज़लेला नवी शक्ती दिली आहे. काही हिंदोस्तानी शब्दही इतके चपखल आले आहेत की बस कौतुक करण्यावाचून दुसरा उपाव रहात नाही.

मी आळवू पहातो बाल्यातला सुरांना
ओठांस भैरवीचा अजुनी सराव नाही

- असे तुम्ही का म्हणता हेच कळत नाही. तुमची ग़ज़ल तर परिपक्व ग़जल आहे.

वागविलास