अश्वत्थाम्याचे रूपक आवडले. फार सुरेख.
कथेचा ओघ विलक्षण आहे आणि शब्दकळाही सुरेख आहे.
तरीही असे म्हणावेसे वाटले की शब्द थोडे कमी वापरले असते तर अधिक परिणाम साधला असता. म्हणजे नक्की कसे ते दुर्दैवाने सांगता येणार नाही. तुम्ही वर संगीतावर लिहिले आहे म्हणून तेच रूपक वापरण्याचा प्रयत्न केला तर असे म्हणता येईल की नुसत्या निषादावरून 'आता षडजाला जाणार' असा आविर्भाव करून झटक्यात खाली येणाऱ्या गायकाच्या निषादात उमटलेली षड्जाची ती छाया किंवा त्या षड्जाची श्रोत्यांच्या मनात उमटणारी प्रतिमा कधीकधी खऱ्या षड्जापेक्षाही जास्त मोहक ठरते. याचा अर्थ षड्ज लावूच नये असा नाही पण तो कधी लावावा यात बरंच काही आहे असं वाटतं. प्रस्तुत कथेत तो षड्ज इतका स्पष्ट दिसत होता की तो प्रत्यक्ष समोर आला नसता तर कदाचित तो जास्त लक्षात राहणारा ठरला असता असे वाटून गेले
--अदिती