इथे तुम्ही वापरलेली शैली मला व्यक्तिशः आवडणारी नाही, हे आधी नमूद करतो आणि मग खोडी काढतो.
"माफ करा हं, आमच्या कुत्र्याने पकडले वाटते तुम्हाला" हा संवाद वाचून हसू
आले. "हे शशिवदने, तुझ्या उन्मत्त श्वानभद्राने माझ्या पोटरी फाडून
चिळकांड्या उडविलेल्या असताना कसली ही थट्टा?" असे काहीसे कथानायकाच्या
मनात येऊन गेले असावे. पण कथेची आब राखण्यासाठी काही गोष्टी वगळाव्या लागत
असाव्यात. असो. गुस्ताखी माफ असावी.
कदाचित पौराणिक रूपक असल्यामुळेही ही शैली अवलंबिली असेल. असे असले तरी प्रत्येक परिच्छेदानंतर मी काहीतरी चांगले, भारी, कसदार वाचतो आहे असे वाटून गेले. काही वाक्ये तर अतिशय कोरीव आहेत. तुमच्या आगमनाने मनोगतावरील साहित्याचा दर्जा खूप उंचावला आहे, ह्याबद्दल दुमत नाही. कळावे. लोभ असावा.
चित्तरंजन