गुजरात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. श्री. पंकज जोशी यांनी उपस्थित केलेले मुद्दे अगदी योग्य आहेत.या निमित्ताने काही बाबींची चर्चा होणे आवश्यक वाटते.
१. तहलका ने एकांगी बाजू मांडली आहे. ज्यांचे नातेवाईक गाडीला लावलेल्या आगीत भस्मसात झाले, त्यांच्या मुलाखती का नाहीत? कारसेवकांच्या बोगीला आग लागल्यावर न तळमळता, आक्रंदता त्यांचे सुखात स्वर्गा रोहण झाले असेल यावर केवळ मूर्खच विश्वास ठेवतील. त्यांच्या वेदना ह्या कमी कशा ठरतात? केवळ हिंदूनी जाळल्यावर/मारल्यावरच वेदना होतात, हिंदूना मारल्यावर नाही?
२. मोदीनी दंगलखोरांना चिथावणी दिली असेलही... पण सामान्य जनता इतकी का पेटून उठली? केवळ राज्यकर्त्यांनी पेट्वलेली दंगल नसून सातत्याने दबावाखाली असलेल्या एका बहुसंख्य समाजाची ती उस्फुर्त प्रतिक्रीया होती.याची कोठेही वाच्यता नाही? राजकारणी खुषाल चिथवतील हो, लोक मूर्ख आहेत का? सामान्य माणूस का पेट्ला?
३. दंगलीची तत्कालिन पार्श्वभूमी कदाचित 'कारसेवकांच्यावरिल हल्ला" अशी असेल पण त्यापाठीमागील कारणे , जी वर्षानुवर्षे हिंदू मनात खदखदत आहेत-
अ. स्वातंत्र्योत्तर काळातील अल्पसंख्यांकाचे तुष्टिकरण
ब. दरीद्री आणि अशिक्षित मुस्लीम समाज
क.पाकीस्तानचे भारताविरुद्धचे शीतयुद्ध
ड. राजकारणातील निर्लज्ज तडजोडी-'फोडा -झोडा'नीती आणि जातीयवादाला खतपाणी.
इ. "भारतीय"मुस्लिमांची रोडावणारी संख्या.
ई मुस्लीम दहशतवादाचे जागतिक आयाम
फ. संपूर्ण फसलेला 'तथाकथित' धर्म निरपेक्षतावाद
या पार्श्वभूमीवर दंगलीचा विचार केल्यास त्याचे भयानक स्वरुप लक्षात येईल. जोपर्यंत या गोष्टींचा मूळापासून विचार होत नाही आणि यावर काय्मस्वरुपी उपाय योजना होत नाही तोवर ही समस्या अधिकाधिक जटील होत जाईल. या अर्थाने आपण सारे एका ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, त्यामुळे एखाद्या क्षुल्लक घटनेचे गंभीर प्रतिसाद उमटू शकतात.
खरेतर निवडणूकीच्या तोंडावर असले 'प्रक्षोभक' वातावरण निर्माण करून सवंग लोकप्रियता मिळवणारे 'पत्रकार' हे भारतीय समाजाचे खरे शत्रू आहेत. यामूळे कदाचीत मोदींनाच फायदा होईल.
(क्या शेर आदमी है....किसीको डरता नही... खुल्ले आम बोला....!)
-विटेकर