गुजरात मधे गोध्राची घटना घडली तेंव्हा मी कामानिमित्त बडोद्याला होतो. कारसेवकांना जाळल्याची बातमी ही तिथे एखाद्या आगीसारखी पसरली. त्यांत अफवांना ऊत आला होता. महिला प्रवाशांवर बलात्कार करून त्यांची वक्षस्थळे कापून इतस्ततः फेकली असल्याचे लोक शपथेवर सांगत होते. अर्थातच वातावरण अत्यंत प्रक्षुब्ध झाले होते. त्यांत मोदी घटनास्थळी पाहणी करायला गेले असता लोकांनी त्यांना धक्काबुक्की करून बांगड्या भरा असे सुनावले होते. हे मी स्वतः अनुभवले आहे म्हणून लिहिले. यात कोणाची बाजू घेण्यात मला रस नाही. एकाचा सूड दुसऱ्यावर काढणे हे चुकीचेच आहे. पण परिस्थिती ही खरोखरच हाताबाहेर गेली होती.