जर निकॉन धाटणीची असेल तर अवश्य बसेल. टॅमरॉन, टोकिना, सिग्मा वगैरे मंडळी भिंगरचनांसाठी प्रसिद्ध आहेत, ते सर्व कॅमेऱ्यांसाठी भिंगसंच बनवितात. भिंगसंचावर ----माउंट (--- = निकॉन/ कॅनन वगैरे) असे लिहिलेले असते. या मंडळींची भींगे मुळ कॅमेरा उत्पादकांच्या भींगचसंचांच्या मानाने स्वस्त असतात. पण आपण जर मूळ निकॉन ची जी वर्गातील भींगे घेतलीत तर स्वस्तात मिळतात. डी वर्गाच्या भींगसंचांना स्वतःचे अंगचे प्रकाशग्राहीछीद्र (ऍपरचर) असते व जी वर्गाच्या संचांना ते नसते, ते केवळ कॅमेऱ्याच्या नियंत्रणाद्वारेच प्रकाशग्रहण कमी अधिक करू शकतात. मात्र बहुतेक डिजीटल एस एल आर ला जी श्रेणीची भींगे चालतात, अर्थात खरेदी करताना विचारून व आजमावून मगच घेणे. मी माझ्या पूर्वीच्या निकॉन एफ ६५ ला २८-८० व ७०-३०० असे जी श्रेणीतले संच वापरायचो, प्रतिमा समाधानकारक होत्या.

सध्या एस एल आर पेक्षा कमी किंमतीत पॅनासोनिक - ल्युमिक्स (लेइका जर्मन भींगसंच) मध्ये अनेक झकास कॅमेरे आले आहेत, ऑलिंपसचा एस पी ५५० यू झेड २८-५०४ हा १८पट ऑप्टीकल झूमचा संच बरा वाटतो, सिंगापूरात ६४९ सिं डॉ ला होता, इथे १९-२० च्या आसपास असावा; त्याच्याहून अद्यावत एस पी ५६० हा १८पट भींगक्षमतेचा (२७-४८६ ) इथे बहुधा २५-२७ च्या आसपास असावा. घाई नसेल तर थांबा, दिवाळी व लग्न मुहुर्त संपले की मार्चमध्ये तो ३-४ हजारांनी खाली येइल, तोवर त्याच्या पुढचा आलेला असेल.