गुड्डी छान होता ह्यात प्रश्न नाही. तुम्ही हे लिहिलेयही झकास. एक किरकोळ सुधारणा हवी असे वाटते.

गुड्डी हा जया भादुरीचा पहिला चित्रपट होता असे वाटत नाही. गुड्डी १९७१ मध्ये आला. त्याच्या आगे मागे उपहार हा चित्रपट बघायला मिळाला. मला वाटते उपहार(नायक स्वरूप दत्त) आणि त्याच्याही आधी जय जवान जय मकान (नायक अनिल धवन) असा एक चित्रपट आला होता त्यात जया भादुरी होती. किती जणांना ह्या चित्रपटाची कल्पना आहे माहीत नाही मात्र त्या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्राम बेडेकर होते आणि संगीतकार भास्कर चंदावरकर.(चंदावरकरांचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट असावा. चू. भू. द्या. घ्या.) कदाचित त्याच्याही आधी महानगर नावाचा एक सत्यजित राय चा बंगाली चित्रपट आलेला होता त्यात जया भादुरी होती.

गुड्डीमध्ये अमिताभ बच्चनला जया भादुरीचा नायक म्हणून घेणार होते, हे ही अचंबित करणारे आहे. अमिताभचा परवाना हा चित्रपट १९७१ मध्ये (की आधी?) आला होता त्यात तो खलनायक होता. (नायक नवीन निश्चल) गुड्डीमध्ये परवानाचे चित्रिकरण दाखवून अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन म्हणून दाखवलेला (म्हणजे खलनायकाच्या स्वरुपात) आहे असे पुसटसे आठवते.

अर्थात तुमची माहितीही बरोबर असेल. चूक भूल द्यावी घ्यावी.