मी सहज गंमत म्हणून काहीजणांना ठ्ठ, ख्ख, ढ्ढ, थ्थ, फ्फ हे उच्चार करायला सांगितले.  त्यांना ते सहज जमले आणि ऐकणाऱ्यालाही काही वावगे वाटले नाहीत. पण, ध्ध, ध्द, ख्क, ढ्ड, ठ्ट, थ्त, ह्म, ह्न असले उच्चार मात्र करणे जवळ जवळ अशक्य वाटले. निदान या कारणास्तवतरी विठ्ठल, लख्ख, बुढ्ढा, नथ्थूमल, लफ्फा तसेच ब्राम्हण,  चिन्ह हे शब्द मराठीत शुद्ध समजायला हरकत नसावी.