ज्या गोष्टीसाठी कापड वापरायचे असेल त्याच्यापुढे पाट (=पट = वस्त्र?) असे लावायची पद्धत होती. उदाहरणार्थ गादी करायचे कापड = गादीपाट. किंवा वधुवरांच्या मध्ये धरायचे असेल ते अंतरपाट, गोणी (पोती) बनवायचे कापड ते गोणपाट असे.

त्या धर्तीवर सदऱ्याच्या कापडाला सदरेपाट म्हणायला हरकत नाही.

सूट हा शब्द मराठी शब्द म्हणून वापरायला हरकत नाही (सुटाचा सुटात सुटाबुटात अशा प्रकारे तो मराठीत चांगलाच रूढ झालेला आहे.) तेव्हा सूटिंगला सूटपाट असे म्हणता येईल.

असे नवे तयार केलेले (किंवा जुने काहीसे विसरलेले पण नव्याने पुन्हा वापरात आणलेले ) शब्द मुद्दाम वापरून विपुल आणि सातत्याने लेखन करीत राहिल्यास कालांतराने ते (पुन्हा) रूढ व्हायला काहीच अडचण येणार नाही असे वाटते.