पहिले दोन भाग वाचतानाच कथेचा विषय आणि धाटणी ह्यावरून मला ही कथा रॉल्ड डालची असणार असा अंदाज आला होता. मात्र हा अनुवाद आहे हे माहीत नसल्यामुळे रॉल्ड डालच्या कथेवर आधारित स्वतंत्र कथा असावी असे वाटले होते. कथेचा विषय मला खास आवडला नसला तरी अनुवाद आवडला. मात्र मूळ कथा ही भारताबाहेर घडली असणार, त्यात पुण्याचे नाही तर दुसऱ्या देशातील शहराचे नाव असणार. ते तसेच न ठेवता त्यात पुणे का आणावेसे हे कळले नाही. मला ते आवडले नाही.