परवाना गुड्डीच्या आधीचा ही तुमची माहिती बरोबर आहे. मला वाटते, आनंदही गुड्डीच्या आधीचाच किंवा बरोबरीचा असावा. हृषीदांनी अमिताभला गुड्डीत नायक म्हणून घेतले नाही याचे कारण त्यांना एक 'फ्रेश' चेहरा हवा होता. त्याआधी अमिताभचे बरेच पडेल सिनेमे येऊन गेले होते, हे आपण जाणतोच.

जया भादुरीचा पहिला सिनेमा कोणता याची नक्की माहिती नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही.