चित्रपट परीक्षण/परिचय  नेहमीप्रमाणेच छान.

हृषिदांचा 'गुड्डी' असा माणसातल्या चांगुलपणावर परत विश्वास टाकावा, असे वाटायला लावणारा आहे.

सहमत. खेरीज हृषिदा असेही म्हणाले होते की 'कुसुमच्या निमित्ताने मला सर्वच किशोरवयीन मुलामुलींना रुपेरी पडद्यामागे काय काय धडते ते दाखवायची इच्छा होती.' असे करावेसे वाटणे हेच विशेष आहे!

आणि जळून खाक झालेल्या स्टुडिओमध्ये भूतकाळात हरवून गेलेला धर्मेंद्र... हे सगळे कुठेतरी खोल जाऊन पोचते.

त्यावेळी धर्मेंद्र म्हणतो "यहीं बिमलदाने मधुमती बनायी, बन्दिनी बनायी." तो जळून खाक झालेला स्टुडिओ, धर्मेंद्रने भावुक होऊन म्हटलेले ते वाक्य ह्यांमुळे माझ्या पोटात तर अगदी कालवाकालव झाली होती!  

'आजा रे परदेसी' हे बाकी हृषिदांना यात का घ्यावेसे वाटले असेल, काही कळत नाही.

आपणही एखाद्या घरगुती समारंभात घरातील जरा बरा आवाज असलेल्या मुलामुलींना गाणे म्हणायला सांगतोच की. तसेच हे आहे. उलट नवीन गाणे न घेता माहितीतले गाणे घेणे हे जास्त पटण्यासारखे वाटते. त्याचा गाण्याच्या अर्थाशी फारसा संबंध नसावा. एक सुंदर गाणं हेच कारण. शिवाय हृषिदांनी बिमल रॉय बरोबर कामही केलेलं आहे. त्यांच्या काही चित्रपटांचं त्यांनी एडिटिंग केलं आहे. त्यामुळे त्यांना बिमल रॉय बद्दल अत्यंत आदरही असेल. म्हणून त्यांनी बिमलदांच्या चित्रपटातलं छानसं गाणं घेतलं. असा माझा तर्क आहे.

जया भादुरीसमोर समीत भांजा म्हणजे जी. ए. कुलकर्णींसमोर वि. आ. बुवा....

हे सगळं खरं असलं तरी नवीन हा चित्रपटाचा नायक नाही. खरं तर ह्या चित्रपटाला नायक नाहीच. नवीनची व्यक्तिरेखा इतकी गौण आहे की समित भांजाच काय, कोणीही  जरा देखणा आणि महाविद्यालयातील नाटकात सुमार अभिनय करणारा तरूण चालला असता.  'रात और दिन' आठवतोय? त्यात नर्गिसच्या पतीची भूमिका प्रदीपकुमारने केली आहे. त्यासाठी मी मनातल्या मनात दिग्दर्शकाचे अभिनंदन केले होते! कारण त्या इतक्या बिनमहत्त्वाच्या भूमिकेसाठी कसलेला अभिनेता घेणे म्हणजे त्याची प्रतिभा वाया घालवणेच ठरले असते!