डिजिटल इंटरमीजिएट-पुर्ण फिल्म स्कॅन केली जाते जेणेकरून डिजिटल निगेटिव्ह उपलब्ध होते. यात हवे ते कलर करेक्शन्स , कलर मॅचिंग आणि बाकिचे बदल करून  डिजीटल मास्टर बनवले जाते. या मास्टर वरून वेगवेगळ्या माध्यमांसाठी रिपरपज करून प्रिंट, डिवीडी मास्टर, ब्रॉडकास्ट मास्टर बनवले जातात.  फायदा हा की मुळ मास्टर एक असल्याने बाकीच्या माध्यमांच्या प्रती मधे ही गुणवत्ता समान / चांगली राहाते.  DI चा फायदा हा की त्यावरून मग jpeg२००० (१२-bit-colourdepth)प्रत बनवता येते जी  DCI--(Digital-Cinema-Initiatives) क्मप्लायट असेल. आत्ता भारतात बहुतेक डीजिटल सिनेमे mpeg२(१०bit-colour-depth) फॉर्मॅटमधे बनतात. त्या दृष्टीने हे नक्किच पुढचे पाऊल आहे. बऱ्याच इंग्रजी शब्दाना प्रतीशब्द न सुचल्याने काही ठिकाणी रोमन लिपिचा वापर केला आहे