वर अजय ह्यांनी हे छानपैकी विषद केलेले आहेच. मी त्यात सर्वसामान्य जनांना कळावे ह्या हेतूने थोडी भर घालतो आहे.

फिल्म कॅमेरा चित्रीत करतो, ते फिल्म- निगेटिव्हवर. ही निगेटिव्ह 'मास्टर' असते, व पुढील सर्व संस्करण करण्यासाठी तिला वापरणे धोक्याचे असते (कारण ती खराब होईल). म्हणून तिच्यापासून एक फिल्म- प्रिंट (पॉसिटिव्ह) तयार केली जाते. ही आय. पी-- Intermediate Positive. हिचा वापर पुढील सर्व संस्करणासाठी केला जातो. सर्व संस्करण झाले म्हणजे, मूळ निगेटिव्हपासून, त्या संस्करीत पॉसिटिव्हशी जुळणाऱी अशी रिलीज प्रिंट तयार केली जाते. हे पारंपारिक फिल्म रिलीज करण्याच्या प्रक्रियेचे सार आहे.

ह्यात अडचणी आहेत... उदा. रंग विषिष्ट शॉटसाठी बदलणे, स्पेशल इफेक्टस् वगैरे अनेक संस्करणे फिल्मच्या माध्यमातच करायची, तर ते बरेच खर्चिक आहेच, पण त्यात लवचिकता अजिबात नाही.

अलिकडे गेल्या दशकामध्ये जेव्हा विडीयो- प्रोसेसिंग प्रगत होऊ लागले व हे तंत्रज्ञान खर्चाच्या संदर्भात आवाक्यात येऊ लागले, तेव्हा हे सर्व आय. पी. चे काम ह्या माध्यमातच करता येईल का, असा विचार सुरू झाला. अजय ह्यांनी वर कथन केल्याप्रमाणे सुरूवातीलाच कॅमेऱ्यातून आलेली फिल्म अत्यंत सूक्ष्म अश्या तऱ्हेने (2K अथवा 4K) स्कॅन करून त्यापासून विडीयो डाटा मिळवला जातो. हा विडीयो डाटा म्हणजेच 'डिजिटल आय. पी.' इथून पुढे सर्वच संस्करणे-- रंग, स्पेशल इफेक्टस्, इत्यादी--- ह्या माध्यमातच केली जातात. ह्यात खर्चाची बचत तर आहेच, पण लवचिकता तर कमालीची आहे. तसेच ह्या डाटाचा वापऱ करून खास स्पेषल इफेक्टस करणे अत्यंत सोयीचे, व उच्च दर्जाचे असते.

पूर्वी चित्रपटाची रीलिज फिल्म हा तिला प्रदर्शित करायचा एकमेव मार्ग होता, आता अनेक आहेत--- D.V.D. release, Theatre release,  तसेच दूरदर्शनसाठी वगैरे. डिजिटल आय.पी. उपलब्ध असली, की हे सर्व मार्ग सहज खुले होतात. तिच्यापासून उलट प्रक्रियेने परत तयार (संस्कारित) चित्रपटाची निगेटिव्ह केली जाते. तसेच तिच्यापासून थेट वर सांगितलेल्या इतर मार्गांनी चित्रपटाचे वितरण व प्रदर्शन केले जाते.