या संपुर्ण किळसवाण्या प्रकारात केवळ अल्पसंख्यांक्यांचे तुष्टीकरण हा एकच हेतू दिसतो. मुसलमानान्वर झालेल्या अत्याचाराला ओढुनताणून प्रसिद्धी देणारे आणि मोदिन्ना खलनायक ठरवणारे पत्रकार काही गोष्टींचा खुलासा देतील काय?

१) गुजरातमध्ये एकदा घडलेल्या घटनेला मागच्या दोन वर्षांपासून उचलून धरले जात आहे. वारन्वार ती द्रुष्ये लोकान्समोर आणली जात आहेत. गुजरातमध्ये जेवढे बळी गेले असतील त्यापेक्षा कीतीतरी पटीने अधिक हिंदु, काश्मिरी पंडीतांचे काश्मिरात बळी गेले आहेत. आणि अझुनही जात आहेत. या घटनान्ना केवळ एक बातमी म्हणून दाखवले जाते. गुजरातची घटना ठळकपणे समोर आणली जाते. अनेक वर्षंपासून काश्मिरात हिंदुन्वर अमानुष अत्याचार केले जात आहेत. बलत्कार होत आहेत. हिंदुची संपती, जमिनी बळकावून त्यान्ना बाहेर काढले गेले आहे. पण आमच्या धर्मनिरपेक्ष पत्रकारान्ना फक्त मुसलमानान्वर झालेले अत्याचारच दिसतात.

२) मोदिन्ना खलनायक ठरवून त्यांच्यावर कारवाइची मागणी करणारया पत्रकारान्ना अफजल गुरुच्या फाशीची साधी आठवणही येत नाही. केवळ या बेगडी धर्मनिरपेक्षतेमुळे अफजलसारखे अतिरेकी हिंदुंच्या छाताडावर पाय देउनही निर्धास्त राहतात.

३) भिवंडित पोलिस चौकी बांधू नये म्हणून हजारोंच्या जमावाने ज्या निष्ठुरपणे आणि बेमानुषपणे दोन पोलिसांचा बळी घेतला. ही घटना सुधा केवळ बातमी म्हणून समोर आणली गेली. आणि गुजरात बददल मात्र नेहमीच आकांडतांडव केले जाते.

४) १९९२ च्या मुंबई बॉंब्स्फोटातील गुन्हेगाराना अझुनही शिक्षा झालेली नाही. त्या स्फोटानंतर आजतागायत बॉंब्स्फोटांची मालीका सुरुच आहे. मात्र कोणालाच शिक्षा झालेली नाहि. मोदिन्ना मात्र आत्ता या क्षणी फासावर लटकावले जावे अशी यांची ईछा आहे.

५) गुजरात मध्ये जिवंत जाळल्या गेलेल्या कारसेवकांचा यान्ना सोयीस्करपणे विसर पडतो.