माझ्या मते...

>> तहलका ने एकांगी बाजू मांडली आहे.
अगदी मान्य. पण यातून एक अंग तरी समाजापुढे आलंच आणि तेही सुखावह नक्किच नाही. माझ्यामते, या घटनेची दुसरी बाजूही या पत्रकारांनी तितक्याच तन्मयतेने शोधून काढली पाहीजे.  बंडखोर प्रवृत्ती ही दोन्ही बाजूला आहे. केवळ एका बाजूला झोडपून असंतोष भडकणारच. (पहिल्या महायुद्धातही केवळ एकाच बाजूला दोषी ठरवलं गेल्याने दुसरं महायुद्ध झालं) तेव्हा पत्रकारांचा प्रचंड मोठा दोष म्हणजे एकच बाजू प्रकाशात आणणे.
पण... जी बाजू आता उजेडात आली आहे, त्यांवर कोणतीही कारवाई न करणे हे प्रगत न्यायसंस्थेला शोभून दिसणार नाही. ज्यांना हा अन्याय वाटतो त्या प्रत्येकाने दुसरी बाजू प्रकाशात आणून दिली पाहिजे आणि मग त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे.