वहातुकीचे नियम तयार करण्यामागे, प्रवाश्यांच्या जिवीताचे आणि वाहनांचे रक्षण करणे आणि सर्वांना संधी देणे असे ठोस  उद्दिष्ट आहे. भाषेचे नियम (किंवा व्याकरण) तयार करण्यामागे असे कुठलेही ठोस उद्दिष्ट नाही. कोणत्याची भाषेचे नियम हे 'randomly' तयार झालेले असतात, तेव्हा या दोघांची तुलना करणे चुकीचे आहे.

माझे 'शब्दांचा हव्यास' हे पोस्ट 'विचारप्रदर्शनाकरता अधिकाधिक भारदस्त, परिपक्व, सुसंस्कृत ई. ई. भाषेत लिहावे' या विधानाला उत्तर म्हणून होते, त्याचा आपल्या नारायण-नारायन उदाहरणाशी काहीही संबंध नाही. 'शुद्ध' लिहीणे आणि संस्कृतप्रचुर, भारदस्त लिहीणे यातील फरक मला समजतो; आणि शुद्ध लिहीणे म्हणजे जड/शब्दबंबाळ लिहिणे असे मी कोठेही म्हणालेलो नाही. कदाचित आपण माझ्या त्या पोस्टच्या पहिल्या वाक्याकडे लक्ष दिले नसल्याने आपला गैरसमज झाला असावा. अस्तु!