यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषी व्यक्तींना शिक्षा व्हायला हवी. मग त्यांचा धर्म, पक्ष, हुद्दा काही असो.
माझ्या प्रतिसादातील या वाक्याचा अर्थ असा आहे की या सर्व प्रकरणाला जे जबाबदार होते त्यांना शिक्षा व्हायला हवी. (याहून सोप्या भाषेत सांगणे शक्य नाही.) यात हिंदूही आले आणि मुसलमानही. दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावी या सरळ मागणीला इतका विरोध का? आणि समजा तहलकाच्या बातम्या खोट्या आहेत, दंगल झालीच नाही, त्यात कुणी मेलेच नाही, तर नानावटी कमिशनच्या रिपोर्टमधे हे यायला हरकत नाही. आता याचा अर्थ जर मी हिंदूंना झोडतो आहे असा काढला जात असेल तर पुढे चर्चा अशक्य आहे.
परत तोच मुद्दा मांडतो. याच्या इतिहासात जायचे असेल तर फाळणीपर्यंत जाउ शकता. पण ज्यांनी दंगल केली, आग लावली, त्यांना शिक्षा व्हावी याला विरोध का? की आपल्या न्यायव्यवस्थेला काहीच अर्थ नाही?
हॅम्लेट