..आवडलं .. पत्रकारांचा असा समज असतो की त्यांनाच सगळं कळत. पण लालू, मोदी अशी जनतेची नाळ ओळखलेली/ लोकभावना कोळून प्यालेली लोकं त्यांना नेहेमीच पुरून उरतात.
दिल्लीत/मुंबईत बसून अशी पत्रकारिता काय कामाची. यात लोकांचे प्रश्न पुढे येतच नाहीत पण मोकांचे मनोरंजन खचितच होते.
अवांतरः त्या यू ट्यब चा दुवा मिळेल काय .. फार उत्सुकता लागली आहे.. मला व्यक्तीशः लालू वि. उतावीळ पत्रकार, ठाकरे वि. उतावीळ पत्रकार आणि मोदी वि. उतावीळ पत्रकार यात पत्रकारांचा होणारा पचका पहायला जाम मजा येते. कशीही असली तरी ही मंडळी लोकांना ओळखतात हे निश्चित. (पत्रकारांनो/पत्रकारांच्या मित्रांनो ह. घ्या)