तंत्रातही म्हणण्यामागे बातमीदाराचा उद्देश आसावा की गुणात्मक दृष्ट्याही आजचा मराठी चित्रपट हॉलीवुडशी स्पर्धा करत आहेच.
हॉलीवुडशी स्पर्धा असे म्हणणे जरी धाडसाचे असाले तरी गेल्या ३/४ वर्षातील मराठी चित्रपट पाहता गुणात्मक दर्जाचा आलेख नक्कीच वाढता आहे. विशेषतः 'श्वास' नंतर मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचा आत्मविश्वास खुपच वाढला आहे. नविन विषय हाताळायला आजचा मराठी चित्रपट व्यवसायिक कचरत नाहि. आर्थिक गणितावर डोळा ठेउन चाकोरीबद्ध चित्रपट काढण्यापेक्षा वैविध्याकडे त्यांचा कल आहे. काही वर्षांपुर्वी जो मराठी चित्रपट राष्ट्रीय पातळीवरही क्वचितच दिसायचा (उंबरठा, सामना सारखे अपवाद), तो आज अनेक आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात चमकताना दिसतो आहे.
मला वाटतं की ही मागे इतकाच उद्देश असावा.