जर मी स्वःता एखाद्या संस्थेला फोन केला असेल तरच मी माझी कुठलीही खाजगी माहिती सांगतो.
मला आलेल्या फोनवर मी माझी माहिती सांगत नाही.
तुम्ही केलं ते अतिशय योग्य केले. जर त्या संस्थेला तुमच्याकडून माहिती खरोखर हवीच असेल तर ती संस्था पुन्हा एकदा प्रयत्न करेल किंवा नोटिस पाठवेल. आयडेंटिटी थेफ्ट (मराठी प्रतिशब्द सुचत नाही) होण्यापेक्षा नोटिस आलेली परवडली.
बँक तुमची काही माहिती (फोन नं. किंवा नाव, वगैरे) इतर संस्थाना विकत असेल. आता ते कितपत कायदेशीर आहे ते माहित नाही.