तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. मी ही ती माहिती देत नाही. शिवाय ग्राहक सेवा केंद्रावरही काही वेळा ही माहिती द्यावी लागते तेव्हाही थोडीफार भीती असतेच. पण तेवढा विश्वास ठेवावाच लागेल. तरीही मी त्याचे कारण विचारून घेतो.

आयडेंटिटी थेफ्ट किंवा फिशिंग (मराठी?) चा प्रकार वाटला म्हणूनच मी ते प्रसंग (संवाद) इथे लिहीले, जेणेकरून आणखी माहीती मिळून आपल्याला आणखी सतर्क राहता येईल.

बँक तुमची काही माहिती (फोन नं. किंवा नाव, वगैरे) इतर संस्थाना विकत असेल. आता ते कितपत कायदेशीर आहे ते माहित नाही.
माझ्या मते हे कायदेशीर नाहीच. (ते आपल्या संलग्न संस्थांत ते वापरू शकतात असे काही वेळा अर्जावर नमूद केले असते) .
पण काही वेळा असेही होऊ शकते की एखाद्याच्या कार्डचे महिन्याच्या खर्चाचा सारांश (monthly statement) कोणाच्या हाती लागला असेल. त्यावर कार्ड नंबर व फोन क्रमांक/पत्ता असतोच. मग पुढची माहीती वरीलप्रकारे फोनवरून काढल्या जाऊ शकते.