हा कार्यक्रम हिंगोली येथे आयोजीत करण्यात आला होता. आणि प्रसिद्ध ऑपेरा सिंगर ज्यूडी रस्ट व पखवाजवादक उद्धव आपेगावकर या दोघांनी जे काही सादर केले ते शब्दात सांगणे जमणार नाही. मी सहपरिवार ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे. अगदी मंत्रमुग्ध होउन गेलो होतोत. विशेष म्हणजे...काही एक दोन गाण्यांनतर आपण हे विसरून जातो कि, जुडी रस्ट ह्या ऑपेरा सिंगर आहेत. आणि आपेगावकरांचे पखवाजवादन तर.. अंगावर काटा आणनारे आहे.
असो .ऽ ज्या कोणाला जमेल त्याने आवर्जून पाहण्यासारखा कार्यक्रम आहे.