कर्णा बाबत म्हणाल तर त्याच्या बरेचश्या गोष्टी वंदनीय आहेत उदा. दानशुरता, सुर्योपासना, शौर्यत्व, शीलत्व.
खरे आहे. चांगल्या गोष्टी कधीही चांगल्याच असतात.
.......(अपवाद द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग)
केवळ एवढाच अपवाद?
परशुरामांशी खोटे बोलणे. (कवच कुंडले गेल्यावर इंद्राने कर्णाला वासवी शक्ती दिली होती. तिचा उपयोग इतरत्र झाला तरी अर्जुनाशी दोन हात करण्यास कर्णाला आपले शौर्यच पुरेसे होते पण परशुरामांचा शाप महाग पडला.)
असंगाशी संग - खरा मित्र आपल्या मित्राची चूक जाणून त्याची निर्भर्त्सना करतो. कर्णाने तसे काही केले नाही. उलट, दौपदी वस्त्रहरणाच्या आणि पुढे युद्धाच्या प्रसंगात कौरवांची भलामण करत गेला.
चूक ही चूकच असते. मोठमोठ्या लेखकांनी त्यावर कथा कादंबऱ्या रचल्या म्हणून ती बरोबर होत नाही.