"जो जे वांछिल तो ते लाहो" याप्रमाणे नुसता "त" म्हणण्याचा प्रयोग भारी आहे.
काही वाचकांना नुसता "त" पुरेसा होईल, काहींना ताकाचा काय प्रकार (गोड की अदमुरे की आंबट), लोणच्याचा काय प्रकार, भाताचा काय प्रकार (तांदूळ आंबेमोहोर की बासमती, मावळी गावरान की पंजाबी भरदार,भात कच्चा की जास्त शिजलेला) इत्यादी तपशीलांमध्ये रस असेल. त्यामुळे आपण फक्त शिधा देऊन काय पाहिजे तो मसाला घालून आपापल्या भटारखान्यात / स्वयंपाकघरात / मुदपाकखान्यात रांधायची मोकळीक दिलीत हे उत्तम झाले!

आपल्या प्रायोगिक तत्त्वांचा पुरस्कर्ता,

धीरज