पुष्कळ मनोगतींनी शुद्धिचिकित्सक वापरायला सुरुवात केलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

शुद्धिचिकित्सकात अद्याप कित्येक तृटी आहेत. त्यामुळे त्याचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आम्ही सतत ह्यात सुधारणा करीत आहोतच. त्यामुळे आपण शुद्धिचिकित्सक वापरताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.

१. तुम्ही लिहिलेला शब्द बरोबर आहे पण शुद्धिचिकित्सकाला तो चुकीचा वाटला तर?

हे आमच्या त्वरित लक्षात आणून द्या.

२. तुम्ही लिहिलेला शब्द चुकीचा वाटला पण काहीच पर्याय दिसले नाहीत तर?

ह्याची आम्ही आपसूक नोंद ठेवत आहोत आणि रोज त्यावर कार्यवाही करीत आहोत.

३. तुम्ही लिहिलेला शब्द चुकीचा आहे, मात्र शुद्धिचिकित्सकाने सुचवलेला एकही पर्याय योग्य वाटला नाही तर?

हे ही आमच्या लक्षात आणून द्या.

४ तुम्ही लिहिलेला शब्द चुकीचा आहे; पण शुद्धिचिकित्सकाला ती चूक सापडली नाही तर?

हे आम्हाला (आणि तुम्हालाही) मुद्दाम तसे पडताळून पाहिल्याशिवाय ध्यानात येणे कठीण आहे. तरी जमल्यास असे शब्द आम्हाला कळवा.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा शुद्धिचिकित्सक अधिकाधिक सकस होत जाईल हे निश्चित.