कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. उच्चारामध्ये बरीच तफावत होती पण रस्टताईंच्या प्रभावी सादरीकरणामूळे ते लक्षातही आले नाही.

आपली बरीच मंडळी परदेशात जात आहे आणि पूढील २५/३० वर्षानंतर अशी मराठी बोलली गेली तर वेगळे वाटू नये.

रस्ट ताई या आपल्यापेक्षा चांगल्या सश्रद्ध वारकरी आहेत आणि १९७७ पासून युरोपातील आश्रमात नामसप्ताह मध्ये भाग घेत आहे.

खेळ मांडियेला वाळवंटी, यात त्यांनी अशी शंका विचारली की रुढ भाषेत वाळवंट म्हणजे जेथे वाळुच आहे आणि काही पिकत नाही. पण जेथे भक्ती वाढली, पसरली आणि रुजली ते वाळवंट कसे असेल?

नामदेवाच्या हातातून विठठलाने नैवेद्य घेतला यावर त्यांच्या मुलाचा विश्वास बसला नाही तेंव्हा त्यांनी त्याला सांगितले की हा मुलगा आणि विठ्ठल दोन्ही वेगळेच होते.