'मृत्युंजय' शाळेत असतानाच वाचली पहिल्यांदा, नंतर प्रौढपणी परत वाचली. शाळकरी वयात तर भारावूनच गेलो होतो. नंतर असे लक्षात आले की त्या वेळच्या घटनांना किंवा पात्रांच्या वागण्याला आत्ताच्या  चालीरीतींचे मोजमाप लावून चालणार नाही. बऱ्याचशा पौराणिक व ऐतिहासिक कादंबरीत आपण ही चूक करत असतो.

तरीही एकंदर एकांगी व कर्णाचे महत्त्व पटवून देताना अर्जुन वा भीमाला उगाचच छोटे दाखवण्याची गरज नव्हती असे वाटते.