अशी चर्चा आधीही झाली होती. माझे ह्याबाबतचे लिखाण/मत इथे वाचू शकाल.
ह्या चर्चेनंतरच्या दिवाळीत मी आणि माझे मित्र बंगळूर वरून पुण्याला रेल्वेने येत होतो. त्यावेळी मी माझ्या मित्रांना कचरा बाहेर टाकू दिला नाही. कोणी तसे केले/करायचा प्रयत्न केला की आम्ही त्याला टपली किंवा हलकेच चापट मारायचो. कचरा आम्ही एका पिशवीत जमा करत राहिलो व मधील स्टेशनवरील कचऱ्याच्या डब्यात टाकत होतो. तसेच काही इतर मुलेही होती त्यांनाही खिडकीतून जेवणाची वेष्टणे टाकण्यास आम्ही मज्जाव केला होता.