द्रौपदी, जी आधीच पाच जणांची बायको होती तिलाही काय फरक पडला असता?
हे वाक्य वाचून आपल्याला शिसारी आली. क्षमस्व.
माझं असं म्हणणं आहे की पांडव म्हणजे धर्माची बाजू आणि कौरव म्हणजे अधर्म अशी जी मांडणी झाली आहे ती का? चुका दोन्ही पक्षांकडून झाल्या आहेत, कर्णाकडूनही त्या झाल्या. पण मग नेहमी कर्णाच्या चुका, त्याने त्या वेळी काय करायला पाहिजे होतं? तो असं का वागला? यावरच चर्चा का? का लहानपणापासूनच्या सांगण्यामुळे पांडव म्हणजे चांगलेच हे धोरण आंधळेपणाने स्विकारलं गेलंय?
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" हेच वाक्य एवढं विशेषत्त्वाने प्रसिद्ध का पावलंय? आख्ख्या युद्धात आपल्याला हवा तसा धर्म वाकवणाऱ्या कृष्णाने असं का म्हणावं? कर्ण, त्याचं जीवन, त्याच्या चुका यावर खूप वेळा चर्चा झाली आहे. दुसऱ्या बाजूने पण चर्चा व्हायला हवी.