माझं असं म्हणणं आहे की पांडव म्हणजे धर्माची बाजू आणि कौरव म्हणजे अधर्म अशी जी मांडणी झाली आहे ती का? चुका दोन्ही पक्षांकडून झाल्या आहेत, कर्णाकडूनही त्या झाल्या. पण मग नेहमी कर्णाच्या चुका, त्याने त्या वेळी काय करायला पाहिजे होतं? तो असं का वागला? यावरच चर्चा का? का लहानपणापासूनच्या सांगण्यामुळे पांडव म्हणजे चांगलेच हे धोरण आंधळेपणाने स्विकारलं गेलंय?

असं स्वीकारणं योग्य नाही पण याचं कारण असं की मृत्युंजय, राधेय जसे ताकदीच्या लेखकांनी उभे केले तसेच महाभारत हे या लेखकांपेक्षा लाखोपटींनी अधिक प्रतिभा असणाऱ्या महर्षी व्यासांनी उभे केले आणि आता जसे, मृत्युंजय वाचल्यावर कर्णाची बाजू बरोबर वाटते तसे महाभारत ऐकल्या वाचल्यावर लोकांना पांडवांचीच बाजू बरोबर वाटली तर त्यात नवल कोणते?

राजकारण, इतिहास यांत कोणी एक व्यक्ती सतत बरोबर असणे किंवा सतत चुकीची असणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे चुकीला चूक म्हणावे आणि बरोबरला बरोबर हेच योग्य वाटते. (चूक आणि बरोबर हेही तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार आहे का ते पाहावे. उदा. शिवाजीराजांना आठ राण्या होत्या, म्हणजे स्त्रीजातीबद्दल त्यांना अजिबात आदर नव्हता असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.)

"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" हेच वाक्य एवढं विशेषत्त्वाने प्रसिद्ध का पावलंय?

कारण तेही तेवढ्याच ताकदीच्या आणि श्रेष्ठ गणल्या जाणाऱ्या लेखकाने लिहिले आणि त्याला योग्य मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी ते आपल्यावर ठसवले. मृत्युंजयला इतिहास मानणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत त्यांच्याकडून कर्णच श्रेष्ठ. प्रत्यक्षात श्रीकृष्ण असे काही बोलला का हे सांगता येत नाही. (प्रत्यक्षात रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता ऐकवली का हे ही सांगता येत नाही, पण ती लिहून काढणारा लेखक किती प्रतिभावंत होता हे सहज कळते.)

कर्ण, त्याचं जीवन, त्याच्या चुका यावर खूप वेळा चर्चा झाली आहे. दुसऱ्या बाजूने पण चर्चा व्हायला हवी

अवश्य व्हायला हवी पण ते करताना कोणत्याही बाजूची आंधळी भलामण नको आणि कल्पित कथांची जोड नको.