मी समीर ह्यांच्याशी सहमत आहे. मराठी चित्रपटाबद्दल नेहमीच ओरड होत आली आहे की त्यांना प्रेक्षक मिळत नाही. पण दर्शकांना तशा दर्जाचे चित्रपट तर मिळायला पाहिजेत.

सचिन, महेश कोठारे यांनी त्याकाळी भरपूर चित्रपट काढले आणि चालवून दाखवले. मग भले ते इतर चित्रपटांवरून घेतलेले असोत की नक्कल असो, की स्वतःचे असोत. त्यांच्या त्या चित्रपटांचा प्रभाव असावा की त्यांच्या चित्रपटात काम करणारे ते स्वतः आणि लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ह्यांचे चित्रपट बघायला लोकांना आवडायचे, आवडते. त्या सर्वांचे काम छान होतेच. काही चित्रपटात त्यांचा दर्जा घसरला होता. पण ते ही किती करणार?

(बहुधा)२००१ मध्ये दिवाळीच्या आसपास, मराठी दूरदर्शन वर सुशांत रे उर्फ सिद्धार्थ ह्यांची मुलाखत चालू होती. त्यात त्यांनीही हाच मुद्दा मांडला होता की मराठी चित्रपटाला प्रेक्षक नाही, त्यांचे म्हणणे होते की २ जवळ असलेल्या चित्रपटगृहांत एक मराठी आणि एक हिंदी चित्रपट लागला असेल तर लोक हिंदी चित्रपटालाच जातात. तेव्हा त्या थेट प्रक्षेपणात केलेल्या प्रतिक्रियांत मी हेच म्हणालो की आपण चांगले चित्रपट बनवा, लोक येतील.

सर्वच मराठी चित्रपट बेकार असतात किंवा सर्वच हिंदी चित्रपट चांगलेच असतात असे माझे म्हणणे नाही. हिंदी चित्रपटाला लोक जातात म्हणजे सर्वच हिंदी चित्रपट पाहिले जातात असे नाही आहे. माझ्या ओळखीतील काही जण नायक, नायिका कोण आहेत त्यावरून त्या हिंदी चित्रपटाला जायचे की नाही ते ठरवितात. 'अरे हा आहे ना. मग बेकार चित्रपटच असेल.' वगैरे वगैरे...
त्याचप्रमाणे 'मराठी चित्रपट ना मग बेकारच असेल' अशीच मानसिकता बहुधा मराठी चित्रपटांबद्दल लोकांची झाली होती. 

अज्जुका,
तुमचा चित्रपट कोणता ते कळले नाही/माहित नाही. आता हेच उदाहरण घ्या ना.. तुमचा चित्रपट आमच्या समोरच नाही आला तर आम्ही त्याबद्दल काय सांगणार?

सर्वेक्षणाबद्दल बोलायचे तर काही वेळा ते पटत नाही.

आम्ही काढला होता अर्थपूर्ण चित्रपट आणि गावागावात फिरलो होतो तो घेऊन. जिथे गेलो तिथे तो लोकांनी डोक्यावर घेतला. आर्थिक यश मिळालं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमच्या सिनेमाला ओळख मिळाली.
काही मोजक्या चित्रपटांवरून जर ठरवायचे असेल की लोकांची चव काय आहे तर मग जे भरपूर बिनडोक चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले त्यावरून लोकांची चव काय आहे हे जास्त ध्यानात यायला पाहिजे. तुमचा चित्रपट चांगला असेल, आशयगर्भ असेल किंवा बिनडोक नसेल, म्हणजे लोकांना मराठी चित्रपट आवडतात हे तर समोर आले ना?
परंतु तुम्हीही आलेल्या प्रत्येक माणसाचे मत घेतले होते का? की तेही sample->universe ह्या तत्त्वावर? असेल तरीही ते ही जिथे दाखवला गेला त्याच लोकांकडून ना?
जसे तुम्हाला काही चित्रपट बिनडोक वाटत असतील तसेच भरपूर लोकांना तुमचा चित्रपट बिनडोक वाटत असेल. हा ह्याच्या त्याच्या मताचा प्रश्न आहे.

पारितोषिकांबद्दल बोलायचे तर नेहमी चांगल्यालाच पारितोषिक मिळते असे मला नाही वाटत. आता ते ठरविणाऱ्या लोकांच्या चवीवर ते अवलंबून आहे.
आणि बहुधा काही वेळा इतर कारणेही असतील. हे म्हणण्याचे कारण, नुकतेच मी श्रीराम लागूंचे लमाण हे पुस्तक वाचले. त्यात त्यांनी नमूद केले आहे की त्यांना एक पारितोषिक मिळाले होते. त्याबद्दल त्यांना नंतर माहिती मिळाली की त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर, ह्या नायकाला पारितोषिक देण्याचे राहून न जावे म्हणून त्यांना त्यावर्षी निवडण्यात आले होते. ( आता नेमके शब्द/पारितोषिक आठवत नाही. पण आशय लक्षात घ्या) ह्याचा अर्थ हा नाही निघत की लागूंना पारितोषिक उगाच दिले, पण त्यामागचे कारण वेगळे होते.

बाकी,
मलाही मराठी चित्रपट बघायला आवडतात. पण जेव्हा नव्हतेच तेव्हा कसे बघणार? आता जमेल तेव्हा, जमेल तसे पाहतो.

गेल्या २/३ वर्षात बरे/चांगले मराठी चित्रपट आलेत. हे बघून बरे वाटते. मराठी चित्रपट आलेले बघून आणि प्रत्यक्ष चित्रपट बघून ही.
हो, इथे मराठी वाहिन्यांचा हातभार लागला असेही मला वाटते.