एका अनोख्या प्रवासवर्णनाचा समर्थरितीने घेतलेला आढावा फारच सुंदर आहे. ह्यातून आपली वाचनाबद्दलची डोळस जाण प्रकर्षाने जाणवतेच, पण जे काही आपल्याला जाणवले ते नेमक्या शब्दांत वाचकांसमोर ठेवणे आपल्याला फार छान जमले आहे. हा लेख लिहून हे असे अंधारात असलेले पण गुणवान पुस्तक आमच्या समोर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद.

मी नियमीतपणे मराठी दैनिकांच्या स्थळांवर येणारी पुस्तक परीक्षणे व परिचय वाचत असतो, व काही चांगले वाटले, की तशी नोंदही करून ठेवतो. हेतू हा की पुढल्या मुंबई भेटीत ती पुस्तके घेता यावीत. दुर्दैवाने मोकाशींच्या ह्या पुस्तकाचा उल्लेखही मला कोठेही सापडला नाही. पहिली आवृत्ती येण्यासच चार वर्षे लागली, व दुसरी आवृत्ती त्यानंतर तब्बल चौतीस वर्षांनी आली. आणि आली तिची किंमत किती, तर रु. १०० फक्त! असे असूनही त्याला किती उठाव असेल ह्याबद्दल कल्पना न केलेलीच बरी.