>> कर्णावर सरसकट टीका करण्याआधी काही गोष्टींचा विचार करायला हवा.
कर्णावर टिका करत नाही आहे पण कर्णाबद्दल सरसकट सहानूभूती दाखवण्याआधी कींवा त्याला गरजेपेक्षा थोर दाखवण्याआधीही काही गोष्टींचा विचार करायला हवा. मृत्यंजय वगैरे कादंबऱ्या म्हणून श्रेष्ठ आहेत यात वादच नाही, कर्णाच्या जीवनात त्यावर अन्याय झाला नाही असंही नाही आणि पांडवांनाही गरजेपेक्षा जास्त चढवून ठेवलं पाहीजे असंही नाही. पण त्याचवेळी कर्ण फार महान नसून मृत्यंजय वा तत्सम कादंबऱ्या इतक्या ताकदीने उतरवल्या गेल्यामुळे कर्णाची प्रतिमा वास्त्वापेक्षा उंचावली गेली आहे हे मान्य व्हायला काही हरकत नसावी
तसंही कादंबऱ्या आणि कादंबरीकार यांनी अनेक वाईट लोकांना उगाचच श्रेष्ठ दाखवलं आहे जसं हिटलर, टिपू सुलतान इ. याही लोकांमध्ये चांगले गुण असतील, यांच्यावरही आयुष्यात अन्याय झाले असतील पण म्हणून ते श्रेष्ठ थरत नाहीत.