अतिशय सुंदर पुस्तक परीक्षण. नेमक्या शब्दांमध्ये पुस्तकाची सुंदर ओळख करून दिली आहे.

तरीही हे पुस्तक निघाले पदयात्रेनंतर चार वर्षांनी (डिसेंबर १९७१). आणि पुढची आवृत्ती थेट जून  २००४!. त्यानंतर काही नाही!  एक वाचनाची आवड असलेली व्यक्ती म्हणून मला ही मान खाली घालावीशी गोष्ट वाटली एवढे (आणि एवढेच! अशी इतरही बरीच पुस्तके आहेत हे मान्य. पण या पुस्तकाबद्दल लिहिताना हे टिपावेसे वाटले) प्रामाणिकपणे नोंदवू इच्छितो.

सहमत आहे. चांगली पुस्तके धूळ खात पडलेली पाहिली की मान खाली घालावीशी वाटते.


मी शाळेत असताना मोकाशींची एक कथा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात होती. बहुधा १९९३-९५ च्या सुमारास. प्रभा नावाचा कथानायक. बोटीवरून घरी परत येतो. आणि रेडिओशी खेळत असताना कोणी तरी मदत मागत आहे अशा फ्रिक्वेन्सीवर तो रेडिओ ट्यून होतो. त्याचवेळी प्रभावर लाईन मारणाऱ्या एका मुलीला गाणे ऐकायचे असते तर दुसऱ्या मुलीला त्या मुलीचा हेवा वाटत असतो अशी काहीशी कथा होती. त्या कथेचे नाव आणि कथासंग्रह तुम्हाला माहिती आहे का?