असं स्वीकारणं योग्य नाही पण याचं कारण असं की मृत्युंजय, राधेय जसे ताकदीच्या लेखकांनी उभे केले तसेच महाभारत हे या लेखकांपेक्षा लाखोपटींनी अधिक प्रतिभा असणाऱ्या महर्षी व्यासांनी उभे केले आणि आता जसे, मृत्युंजय वाचल्यावर कर्णाची बाजू बरोबर वाटते तसे महाभारत ऐकल्या वाचल्यावर लोकांना पांडवांचीच बाजू बरोबर वाटली तर त्यात नवल कोणते?
पांडवांचीच बाजू बरोबर ????
पितामह भीष्मांकडून युद्धात अभय मिळवण्यासाठी द्रौपदीला पुढे करणे वा द्युत खेळताना आपल्या भावांसकट पत्नीलाही दावाला लावणे हे बरोबर?
सदैव सुतपुत्र म्हणून हिणवणे हे बरोबर?
सत्य माहीती असुनही कायम हीनवणे आणि सेनापतीच्या अंगी असणारे सारे नेतृत्वगुण असुनही केवळ अर्धरथी म्हणून संबोधणे हे बरोबर?
माफ करा परंतु वरील सर्व बाबी ह्या महाभारतातीलच आहेत आणि त्या कल्पित कथा नव्हेत.
त्याचप्रमाणे कौरव किंवा कर्ण हा सर्वगुणसंपन्न होता आणि पांडवचं तेवढे वाईट असे सुद्धा नाही.
चुका ह्या दोन्ही पक्षांच्या होत्या आणि त्या आपण सर्वांनी मान्य केल्या पाहिजेत अन्यथा या चर्चेला अर्थ(अंत) राहणार नाही हे आपण सर्वजण जाणता.
कलोअ,
धक्का.