मला वाटते मराठीत 'विज्ञान काल्पनिका' लिहिणारे दि. बा. मोकाशी हे पहिले लेखक असावेत. चू. भू. द्या. घ्या.

आम्हाला त्यांची 'सुदेष्णा' ही विज्ञान काल्पनिका अकरावीत (जुनी एस एस सी) स्थूल वाचनाला होती. सुदेष्णा नावाचा पृथ्वीसारखाच एक नवा ग्रह आहे आणि त्यावर कायमचे राहायला जाण्यासाठी एक कुटुंब निघालेय अशी काहीशी कथा होती. त्यात वैज्ञानिक बारकाव्यांपेक्षा सामाजिक परिणामांवर जास्त भर दिलेला होता असे पुसटसे आठवते.

वरची रेडिओची कथाही अशा विज्ञान कल्पनिकांपैकीच वाटते.

अवांतर : दि. बा. मोकाशींचा रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय होता असे ऐकल्या/वाचल्यासारखे वाटते.