"कर्ण खरा कोण होता?" हे दाजी शास्त्री पणशीकरांचे पुस्तक वाचा.  त्यांचे विचार हे दुसऱ्या टोकाचे वाटले तरी काही अंशी पटण्यासारखे आहेत. हे पुस्तक फक्त महाभारतातील श्लोकांचा सातत्याने संदर्भ देऊन लिहीलेले आहे. कादंबरी म्हणून नाही. थोडक्यात जे आठवते त्या प्रमाणे मुद्देः

  1. त्यावर झालेले अन्याय हे जाती विषयक नव्हते - सूतपूत्र म्हणून नव्हते. कारण सूतपूत्र असून संजयालज़ा सल्लागाराचा मान होता. नंतरच्या काळात पण (सूत पूत्र म्हणून) सौती ऋषी होऊन गेले होते (ज्यांचा महाभारतातपण उल्लेख आहे आणि ज्याने सांगीतलेले महाभारत आपण वाचतो).
  2. कर्णामध्ये उर्मटपणा भिनलेला होता म्हणून तो बऱ्याचदा नकोसा होता.
  3. परशूरामाशी तो खोटे बोलला होता त्यामुळे त्याला पहीला शाप मिळाला.
  4. उगाच गायीवर हत्यार चालवल्यामुळे (जीच्यावर शेतकऱ्याचा उदर निर्वाह अवलंबून होता) त्याला दुसरा शाप (त्या शेतकऱ्याकडून) मिळाला.
  5. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस पण त्याची अशीच (उर्मट म्हणून) ख्याती होती. दृष्ट्रद्युम्नाने स्वयंवराच्या आधीच घोषीत केले होते की रूप, कूल, गूण, यांनी जो कोणी माझ्या बहीणीला आवडेल त्याच्याशी ती लग्न करेल. थोडक्यात स्वयंवरासाठी "प्रीडीफाइंड रूल्स" होते. त्याप्रमाणे कर्णाला द्रौपदीने नाकारले.
  6. द्रौपदी वस्त्रहरण हे कर्णाने सुचवले होते.  हा भिषण प्रकार कुठल्याही काळात विकृत आणि अक्षम्य आहे.
  7. "जो पर्यंत अर्जूनाला मारणार नाही तो पर्यंत घरी येणाऱ्या याचकाला विन्मुख पाठवणार नाही," अशी कर्णाची प्रतिज्ञा होती. थोडक्यात दानशूरपणा हा द्वेष आणि सूडापोटी होता, कायमस्वरूपी नव्हता.
कुंतीने कर्णावर अन्याय केला होता का? ज्या वयात तीला ते मूल स्वतःच्या चुकीने झाले त्या वयात तीची चूक झाली आणि अन्याय होता असे नक्की म्हणता येईल. पण त्या अर्भकाने कधीच तीला आई म्हणून पाहीले नव्हते आणि त्याला "अदरवाईज" आई-वडील मिळाले होते.  त्याने सज्ञानपणी केलेल्या अक्षम्य चुका आहेत. त्याचा सर्व दोष कुंतीवर देणे हे म्हणून अयोग्य वाटते. विचार करा आजपण अनेक अशी दुर्दैवी मुले आहेत ज्यांना आई-वडील विविध कारणांमुळे टाकतात, अनाथाश्रमात अथवा इतरत्र दत्तकघरी वाढतात. त्यांनीमोठेपणी जर अक्षम्य चुका केल्या तर जसे ते त्या गुन्ह्यांसाठी कायद्यासमोर गुन्हेगारच असतात तसेच कर्णाचे आहे असे वाटते.