"मराठी विश्वकोश" विश्व महाजालावर का उपलब्ध नाही. तो मुद्रित स्वरुपातच विकत मिळणार असेल तर तो विकत घेवून पुन्हा काचेच्या कपाटातच घरी बंद ठेवावा लागेल.
तो सर्वसामान्यांनी वाचावा असे वाटत असेल तर तो "युनिकोड" मध्ये लिप्यांतर करून "विकिपेडिया" सारख्या वेबसाईटवर द्यायला हवा. अर्थात त्यामुळे सरकारचे मुद्रित ग्रंथ तसेच पडून राहतील. आणि खर्च झालेले पैसे पुन्हा उभे राहणार नाही.
सरकारचा उद्देश निधी उभारण्याचा नसून सर्वसामान्यांपर्यंत "मराठी विश्वकोश" पोहचावा असा असायला हवा.