महाभारत ही माणसांची गोष्ट आहे. यात कुणीही आदर्श नाही, म्हणूनच दोन्ही बाजूंकडून चुका झालेल्या आढळतील. मला वाटते यात धर्माची बाजू ठरवताना पांडवांना मारण्यासाठी कौरवांनी वेळोवेळी केलेले कट, पाच गावे देउन तंटा सोडवण्याची तयारी असताना त्यालाही नकार अशा सर्वसाधारण न्यायाच्या कक्षेत न बसणाऱ्या गोष्टी धरता येतील. या संदर्भात नुकताच भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झालेला "महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन" हा पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील डॉ. गौरी लाड यांचा लेख वाचायला मिळाला. (भा. ए. सं. मं. ६४ : १ जुलै १९८५). यात त्यांनी महाभारताचा काल निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मते महाभारताच्या व्यासलिखित मूळ स्क्रिप्टमध्ये इ. स. पू. ५०० नंतर वेळोवेळी भर घातली गेली. आत्ता उपलब्ध असलेल्या विविध प्रतींमध्ये मूळचे काय होते आणि भर कोणती हे सांगणे कठीण आहे. यासाठी भांडारकर इन्स्टीट्यूटने महाभारताची संशोधक आवृत्ती काढली ज्यात या सर्व ऍडीशन्स काढण्याचा प्रयत्न होता. चर्चेतील मुद्द्यावर बोलायचे झाले तर कुठल्याही पात्राचे उदात्तीकरण करणे बरोबर नाही असे वाटते. वर सांगितल्याप्रमाणे महाभारतात वेळोवेळी लेखकांनी त्यांना रुचेल तशी भर घातलीच आहे. यानंतर कादंबरी म्हणजे लेखकाचे व्यक्तिगत इंटरप्रिटेशन असते.
बरेचदा अभिजात साहित्य म्हणजे काय असे प्रश्न विचारले जातात. ही चर्चा आणि यासारख्याच अनेक हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मी एखादी गोष्ट मनोगतावर लिहीली तर आठवड्यानंतर तिच्याबद्दल बोलायला मला स्वत:लाच कंटाळा येतो. कमीतकमी अडीच हजार वर्षांनंतरही एखाद्या कथेशी लोक तादात्म्य पावू शकतात, त्यावर चर्चा करतात, अभिजात साहित्याचे याहून चांगले उदाहरण काय असेल बरे?
हॅम्लेट